Bigg Boss 14: तारीख जाहीर, या तारखेला होणार ग्रँड प्रीमियर

salmankhan
सलमान खान

बिग बॉस १४ ची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. चाहत्यांची प्रतीक्षा आतृ संपणार आहे. आता, कलर्सने अधिकृत घोषणा केली असून, या शोचा प्रीमियर कधी होईल याविषयीची माहिती दिली आहे. कलर्सनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या १४ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर पुढील महिन्याच्या ३ तारखेला म्हणजे ३ ऑक्टोबर २०२० ला होणार आहे.

कलर्सने एक प्रोमोही शेअर केला केला आहे, ज्यामध्ये सलमान शोबद्दल सांगत आहे. आणि शोची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र यावर्षी कोणती थीम असणार याबद्दल अद्याप गुप्तताच बाळग्यात आली आहे.

प्रोमोमध्ये असे दिसून आले आहे की सलमान खान दिसतो आणि त्याच्या तोंडावर मास्क आहे. सलमान प्रथम मास्क काढून टाकतो. कोरोना, लॉकडाऊन विषाणू याबद्दल सलमान बोलताना दिसतो. त्याचवेळी सलमान २०२० चे उत्तर देण्याबाबतही बोलत आहे.

आता या कार्यक्रमाची थीम कशी असेल आणि शोमध्ये कोण सहभागी होईल हे हळूहळू कळेल. यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु बिग बॉसची टीम ३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचं करमणूक करायला येणार हे नक्की.


हे ही वाचा – जड अंत:करणाने मुंबई सोडून जात आहे – कंगना