बिग बॉस घरात रंगला कॅप्टन्सीचा टास्क

कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान वैशालीने केले रुपालीवर आरोप. तरी देखील रुपालीने फोन ठेवला नाही.

Mumbai
बिग बॉस सिझन २

सध्या बिग बॉस सिझन २ च्या घरात केवीआर ग्रुपमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या ग्रुपमध्ये एकमेकांना समजवण्याचा प्रकार चालू आहे. ‘बीबी हॉटेल’च्या टास्क नंतर दोन्ही टीममधून सर्वात चांगल्या खेळाडूचे नाव हे कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी देण्यात आले. ‘टीम ए’ मधून रुपाली भोसले तर ‘टीम बी’ मधून अभिजीत केळकर या दोघांचे नाव सर्वानुमते देण्यात आले. मग यानंतर कॅप्टन्सीच्या टास्कला सुरूवात झाली. टास्कच्या पहिल्या फेरीत अभिजीत आणि रुपालीला त्याच्या अतिशय जवळच्या वस्तू देण्यात आल्या. अभिजीतला त्याचा कापलेला फॅमिलीचा फोटो आणि रुपालीला तिचा टेडी परत देण्यात आला. या वस्तू परत घेण्यासाठी दोघांनाही संधी देण्यात आली पण दोघांनी ती संधी सोडली. त्यामुळे या पहिल्या फेरीत कोणालाही गुण मिळाले नाहीत. यावर घरातला एक दिवस संपला.

दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही रुपाली आणि विणाच्या वादाने झाली. बिग बॉसच्या घरातले नियम पाळले नाही म्हणून घरातील सर्व खाण्याच्या वस्तू जप्त केल्या होत्या. त्यादरम्यान विणाचा असलेला अॅटिट्यूड हा रुपालीला आवडला नाही. त्यामुळे गेले दोन दिवस त्या दोघींमध्ये वाद सुरु आहे.

कॅप्टन्सीच्या दुसऱ्या फेरीत दोन्ही कॅप्टन्सी उमेदवारांना फोन टास्क दिला होता. रुपालीचे समर्थक हे नेहा, किशोरी शहाणे, हिना होती. तर अभिजीतचे समर्थक हे विणा, शिव आणि वैशाली होती. माधव या टास्कचा संचालक होता. या टास्कमध्ये समर्थकांनी आपल्या विरोधी उमेदवाराला फोन ठेवण्यास भाग पाडायचं होतं. टास्कमध्ये सुरुवातीला रुपाली फोन घेण्यासाठी गेली. वैशालीने फोनवर बोलण्यास सुरुवात केली. वैशालीने बरेच आरोप रुपालीवर केले. ‘तू खूप स्वार्थी आहेस. तू गेम जिंकायला तुझ्या भावाचा वापर करतेस. त्याच्या भावनांशी खेळतेस. तुला पाहिजे तेव्हा तू सगळ्यांचा वापर करतेस. तु विणावर जळतेस कारण तुला आता तुझी सतत विचारपुस करायला कोणी नाही. तु परागचा वापर करून खेळत होतीस’, असे अनेक आरोप वैशालीने रुपालीवर केले. तरी देखील रुपालीने फोन ठेवला नाही.

त्यानंतर अभिजीत फोन घेण्यासाठी गेला. त्याला रुपालीनंतर गेल्याचा फायदा झाला. अभिजीतच्या वेळेस कोण कोणाला फोन ठेवायला भाग पाडातयं हेच कळतं नव्हतं. अभिजीतच रुपालीच्या समर्थकांवर भारी पडला. तो रुपालीपेक्षा जास्त वेळ टास्कमध्ये टिकून राहिला आणि अभिजीतला या दुसऱ्या फेरीत एक गुण मिळून तो विजयी झाला. आता अभिजीतकडे बिग बॉसच्या कॅप्टन पदाची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात अभिजीत कॅप्टन पदाची जबाबदारी कशा प्रकारे सांभाळतो? हे कळेलं.