Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: अभिनव राखी सावंतला नेसवणार साडी

Video: अभिनव राखी सावंतला नेसवणार साडी

Related Story

- Advertisement -

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. यंदा ‘बिग बॉस’ सीझन १४ राखी सावंतच्या नौटंकीमुळे चांगलाचं चर्चेत आला आहे. तिचा मस्तीखोरपणा आणि ड्रामा यामुळे लोकं तिला जास्त वॉट करून बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी पात्र ठरवतं आहेत. मागील काही दिवसांमध्ये राखीने तिच्या नवऱ्याच्या अनेक गोष्टी घराच्या सदस्यांसोबत शेअर केल्या. तसेच तिला अभिनव शुक्ला किती आवडतो आणि तिला त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे देखील ती अनेकदा शोमध्ये म्हणाली आहे. त्यामुळे राखी आता आपला आवडता अभिनव शुक्लाकडून चक्क साडी नेसवून घेणार आहे.

राखीला अभिनव साडी नेसवतानाचा व्हिडिओ कलर्स टिव्हीने इन्स्टाग्राम शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी अभिनवला साडी नेसवायला सांगते. त्यावेळी अभिनवची बायको रुबिना मी साडी नेसवण्यासाठी मदत करू का?, असे विचारते, तेव्हा राखी तिला म्हणते, नको तुझा नवरा मला मदत करणार आहे. त्यामुळे आज ‘बिग बॉस’ सीझन १४च्या आजच्या एपिसोडमध्ये राखीला अभिनव साडी नेसवताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

राखीची आई रुग्णालयात दाखल!

- Advertisement -

दरम्यान सध्या ‘बिग बॉस’ घरात सदस्यांना त्यांच्या घरातील मंडळी भेटण्यासाठी येत आहेत. आज राखी सावंतची आईने देखील तिला भेटते. पण ते व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यावेळेस राखीची आई रुग्णालयात असल्याचे समजते. त्यामुळे राखी रडायला लागते आणि ती आई बरी होण्यासाठी उपवास पकडते असे सांगते. यादरम्यानचा व्हिडिओ देखील कलर्स टीव्हीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


- Advertisement -

हेही वाचा – अभिनवची दुसरी बायको होण्यासाठी राखीने मागितला नवऱ्याकडून तलाक!


 

- Advertisement -