घरमनोरंजनलवकरच ममता बॅनर्जींवर येतोय चित्रपट!

लवकरच ममता बॅनर्जींवर येतोय चित्रपट!

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही चित्रपट येत आहे. बाघिनी असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमध्ये राजकारणी नेत्यांवर चित्रपट येत असल्याचे दिसत आहे. या वर्षभरात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ‘ठाकरे’ हा चित्रपट आला. त्यानंतर मनमोहन सिंह, राहुल गांधी, लाल बाहादुर शास्त्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजकारणी नेत्यांच्या आयुष्यावर चित्रपट येत आहेत. तर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील मोठे नाव जयललिता यांच्यावर जीवनावर चित्रपट येत आहे. तसेच या चित्रपटांच्या यादीत अजून एका नावाची भर पडली आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही चित्रपट येत आहे. हा चित्रपट येत्या ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बाघिनी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. संपूर्ण भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे.

प्रातिनिधीक फोटो
बाघिनी चित्रपट

राजकारणावर आधारित नाही

लोकसभा निवडणूका सर्व ठिकाणी चांगल्याच रंगल्या आहेत. येत्या निवडणुकीमध्ये ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या आयुष्यावर येणाऱ्या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे. पण आता ममता बॅनर्जी यांच्या आयुष्यावरही मे महिन्यात चित्रपट येत आहे. ‘बाघिनी’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी हा चित्रपट ममता बॅनर्जी यांच्या नावाचा वापर केला नसल्याचे सांगितले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या नावाच्या जागी इंदिरा बॅनर्जी असे नाव देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांची भूमिका अभिनेत्री रूम दासगुप्ता हिने साकारली आहे. ‘ममता दिदिं’ची भूमिका साकारण्यासाठी तिन्हे अभ्यास केल्याचे सांगितले आहे. ‘बाघिनी’ या चित्रपट राजकारणावर आधारित नसुन एका सामान्या स्त्रीचा असामान्य बनवण्याचा प्रवास दाखवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -