घरताज्या घडामोडीसोनू सूदने घरातच थाटले हॉटेल; पालिकेचा दणका

सोनू सूदने घरातच थाटले हॉटेल; पालिकेचा दणका

Subscribe

मुंबई महापालिकेने सोनू सूदला अनधिकृत बांधकाम केल्याने नोटीस बजावली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना परप्रांतीय मजूर बेरोजगार झाल्याने आणि त्यांची उपासमार होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या राज्यात पळ काढला होता. त्यावेळी अभिनेता सोनू सूद याने राज्य सरकारच्या नाकावर टिच्चून त्या परप्रांतीय मजुरांना खासगी बसने त्यांच्या घरी पाठवले होते. मात्र, आज तोच सोनू सूद अनधिकृत बांधकामाप्रकरणी अडचणीत आला आहे. मुंबई महापालिकेने त्याच्या विरोधात थेट जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अंतर्गत कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हजारो उत्तर भारतीयांनी मुंबईतून पळ काढला. त्यांच्या नोकऱ्या, व्यवसाय, कामधंदा गेल्याने त्यांची मुंबईत उपासमार व्हायला लागली होती. त्यामुळे अनेकजण पायी चालत आपल्या राज्यात निघाले होते. त्यावेळी अभिनेता सोनू सूद याने, पुढे येऊन त्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था केली होती. त्यावरून शिवसेना आणि सोनू सूद यांचा वाद झाला होता. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर त्या वादावर पडदा पडला होता. मात्र, त्यावेळी सोनू सूद बराच चर्चेत आला होता.

- Advertisement -

अनधिकृत बांधकाम केल्याने सोनू सूद चर्चेत

आता अनधिकृत बांधकाम केल्याने सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू सूद याने जुहू येथील शक्ती सागर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहिवाशी इमारतीमध्ये परवानगीशिवाय त्यांनी अनधिकृत हॉटेल सुरु केले आहे. तसेच इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले आहेत, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार ४ जानेवारी रोजी महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच, याप्रकरणी पालिकेने सोनू सूद यांना नोटीसही पाठवली आहे.

पालिकेकडून परवानगी घेतल्याचा दावा

‘आपण अनधिकृत बांधकाम केले नसून माझ्याकडे पालिकेची परवानगी आहे, असा दावा सोनू सूद यांनी केला आहे. तसेच, आपण इमारतीमधील बदलासाठी आपण बीएमसीकडून यूझर चेंजसाठी परवानगी घेतली असून फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरीसाठी काम थांबल होतं’, असा दावाही सोनू सूदने यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सलमान खानचा एक सल्ला आणि कश्मीराला झालं जुळं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -