घरताज्या घडामोडीनाहीतर ऑफिस पाडण्यात येईल, BMC ची कंगनाला नोटीस!

नाहीतर ऑफिस पाडण्यात येईल, BMC ची कंगनाला नोटीस!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतच्या समोरील अडचणी आता कमी होत नाहीयेत. बीएमसीच्या टीमने अभिनेत्रीच्या मुंबई कार्यालयाची तपासणी केली. आता बीएमसीने कंगनाला नोटीस दिली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार कंगना रणावतचं कार्यालय बेकायदेशीरपणे बनविण्यात आले आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर नोटीस लावली आहे. बीएमसीचा खात्री आहे की कंगनाच्या कार्यालय बेकायदेशीर आहे. बाल्कनीचा खोली म्हणून वापर केला गेला आहे. कार्यालयीन बांधकामांच्या कामात नियमांचं उल्लंघन केल्याचं बीएमसीचे मत आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम ३५४ (अ) अंतर्गत कंगना आपल्या घरातून कार्यालयीन काम करू शकत नाही. नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, येत्या २४ तासात कंगना यांना आपल्या कार्यालयाच्या बांधकाम व नूतनीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे बीएमसीकडे सादर करावी लागतील. बीएमसीने सकाळी १०.३ वाजता कंगनाच्या ऑफिसच्या भिंतीवर ही नोटीस चिकटविली.

- Advertisement -

महापालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये बेकायदा बांधकामांबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की तळ मजल्यावरील टॉयलेटचे बेकायदेशीरपणे ऑफिस केबिनमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. तर तळ मजल्यावरील स्वयंपाकघर बेकायदेशीरपणे स्टोअर रूममध्ये रूपांतरित झाले. तळ मजल्यावरील पेंट्री बेकायदेशीरपणे तयार केली गेली आहे.

याशिवाय पहिल्या मजल्यावरील खोलीचे बेकायदेशीरपणे विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील देव घर देखील बेकायदेशीर आहे. पहिल्या मजल्यावरील शौचालय बेकायदेशीरपणे बांधले गेले आहेत. दुसर्‍या मजल्यावरील भिंती जोडून बंगला क्रमांक ४ आणि  बंगला क्रमांक पाच अवैधपणे जोडण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटची स्थितीही बदललेली आढळली आहे.

याशिवाय कंगनाला वॉर्निंग देण्यात आली आहे की, २४ तासांच्या आत इमारतीच्या बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रे दाखवावी लागतील, जर तीने दाखविली नाहीत तर कलम ३५४ अ अन्वये कारवाई केली जाईल. अगदी ऑफिसमध्ये वापरण्यात येणारी मशीन्स आणि इतर वस्तू देखील काढून टाकल्या जातील असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -