घरमनोरंजन...आणि आर माधवन काँग्रेसवर भडकला

…आणि आर माधवन काँग्रेसवर भडकला

Subscribe

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणारा एक व्हीडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हीडीओ बघून अभिनेता आर.माधवन काँग्रेसवर चांगलाच भडकला आहे.

सगळीकडेच निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष निवडणूकीसाठी आपला जोरदार प्रचार करत आहेत. एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. या काँग्रेस पक्ष आणि भाजप पक्ष आघाडीवर आहेत. हे दोनही पक्ष एकमेकांवर आरोप करायची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आपल्या ऑफिशीयल ट्वीटर हॅण्डलवरून एक व्हीडीओ शेअर केला होता. हा व्हीडीओ बघून अभिनेता आर.माधवन काँग्रेसवर चांगलाच चिडला आहे.

काय आहे व्हीडीओत

- Advertisement -

कॉँग्रेसने आपल्या ऑफिशीअल ट्विटर हॅण्डलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातील संवादाचा एक व्हीडीओ शेअर केला होता. हा एडिटेड व्हीडीओ आहे. या व्हीडीओत नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या तोंडी चुकीचे संवाद देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे, आणि हा व्हीडीओ शेअर करताना #HugplomacYaadRakhna हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

१४ मार्चला ९वाजून १२ मिनीटांनी हे ट्वीट करण्यात आलं आहे. सध्या हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतय. हे ट्वीट बघूनच आर.माधवन काँग्रेसवर भडकला आहे.

- Advertisement -

काय म्हणाला आर.माधवन

ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. नरेंद्र मी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असताना आपण चीनसमोर आपल्याच राष्ट्राची बदनामीही करत आहोत. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाकडून ही गोष्ट होणं खरचं अपेक्षीत नव्हत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -