घरमनोरंजनमी तान्हाजीच्या इतिहासाशी सहमत नाही...

मी तान्हाजीच्या इतिहासाशी सहमत नाही…

Subscribe

तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासाशी मी सहमत नाही असं खुद्द चित्रपटातील अभिनेता सैफ अली खाननेच सांगितले आहे. चित्रपट चालावा यासाठी या चित्रपटात राजकीय कथा बदलून दाखवण्यात अली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. असं विधान एका मुलाखती दरम्यान सैफने केले आहे.

काही कारणांमुळे मी या कथेबाबत ठोस भुमिका घेऊ शकलो नाही. पण कदाचित पुढच्यावेळी मी याबाबत नक्कीच बोलेन. मी चित्रपटातील भूमिकेबाबत खूप उत्साही होतो. या व्यक्तिरेखेने मला प्रभावित केले होते. मात्र, चित्रपटात जी कथा दाखवली आहे तो इतिहास नाही. इतिहास काय आहे हे मला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या कथेत तथ्य नाही

अभिनय आणि स्क्रिप्टमधील चुका सहन होतील मात्र, व्यावसायिक फायदा व्हावा म्हणून त्याच्या राजकीय कथेत बदल केलेले अजिबात चालणार नाही, असं मत चित्रपट निर्माते कबीर खान यांनी व्यक्त केलं होतं. याचा आधार घेत पत्रकार चोप्रा यांनी सैफला प्रश्न विचारला. त्यावर सैफ म्हणाला, “हे खरं आहे की या चित्रपटात दाखवलेल्या राजकारणाचा तथ्यांशी काहीही संबंध नाही. याच्याशी मी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. मी अशा प्रकारच्या राजकारणावर याआधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी पुढच्यावेळी अशा कथांबाबत अधिक सतर्क राहिल.

धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत

देशातील सध्याची परिस्थिती पाहून आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत असं वाटतं. त्याच्यासाठी कोणी लढतानाही मला दिसत नाही. अभिनेता या नात्याने कोणतीही भूमिका घेत नाही कारण यामुळे माझ्या चित्रपटांवर बंदी येऊ शकते आणि त्याच्या कमाईवर प्रभाव पडू शकतो. बॉलिवूमधील लोकांना आपला व्यवसाय आणि कुटुंब संकटापासून दूर ठेवायचं असल्यानेच राजकीय प्रतिक्रिया देत नाहीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -