घरताज्या घडामोडीVideo: ...म्हणून कॉमेडियन वीर दासवर खोकला 'हा' व्यक्ती!

Video: …म्हणून कॉमेडियन वीर दासवर खोकला ‘हा’ व्यक्ती!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दासने आपल्या ट्विटर अकाऊंवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वीर दासचा एक शेजारी त्याच्यावर भडकलेला दिसत आहे. तो वीर दासवर ओरडत आणि शिवीगाळ करत असताना आहे. वीर दासच्या म्हणण्यानुसार, तो राहत असलेल्या शेजारील इमारतीतील मित्राने त्याला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते आणि तो सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन देखील करत होता. पण तरीही या संतप्त झालेल्या शेजाऱ्याने ओरडण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर हा व्यक्ती वीर दासच्या तोंडावर खोकला.

बॉलिवूड अभिनेता वीर दासने आपल्या ट्विटरवर अकाऊंटवरुन या घटने संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. वीर दासने सांगितले की, या व्यक्तीला तो ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो ते खरेदी करायचे आहे. परंतु तो हे करू शकत नाही आहे. या व्यक्तीशी यापूर्वीही वाद झालेला आहे आणि या वादात त्यांने माध्यमांना देखील सामील केले होते.

- Advertisement -

वीर दासने हा व्हिडिओ शेअर करता लिहिले की, ‘खूप वाईट संध्याकाळ होती. मी तळमजल्यावर राहतो. आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर होतो. रात्री दहा वाजता एक शेजारी आला कारण आम्ही त्यासाठी जेवण तयार केले होते. आम्ही असे कॉम्प्लेक्समध्ये करत असतो. आम्ही त्याला १५ फूट अंतरावर बसण्यासाठी खुर्ची दिली. आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होतो. माझ्या शेजारी घरुन कोक घेऊन आला आणि त्याने मास्क घातला होता. पण त्याने सिगारेट पिण्यासाठी तो खाली घेतला. मी माझ्या घराच्या अंगणात बसलो होतो आणि पाच मिनिटांनंतर ही घटना घडली.’

- Advertisement -

या व्यक्तीने वीर दासला अनेक धमक्या दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच तो अशा परिस्थितीत त्याच्या तोंडावर खोकताना देखील दिसत आहे.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण ११ दिवसांनंतर विषाणूचा संसर्ग पसरवू शकत नाही – वैज्ञानिकांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -