२३ वर्षांनंतर सलमानची हिरोईन करणार कंगनाच्या सिनेमातून कमबॅक

बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री कंगना रनौत ‘थलाइवी’ चित्रपटाचे काम करत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वी या चित्रपटातील कंगनाचा लूक ट्रेंड झाला होता. आता सेटवरील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान कंगनाच्या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री २३ वर्षांनंतर हिंदी चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे.

भाग्यश्रीने ‘थलाइवी’ या चित्रपटाच्या सेटवरील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तिने क्रिम कलरची साडी नेसली आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, ‘मी पुन्हा काम करून खूप खुश आहे.’ सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीचे हे फोटो व्हायरल होत आहे.

‘थलाइवी’ मधल्या भूमिकेबाबत सांगता म्हणाली की, ‘या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका साकारत आहे. कंगना रनौतसोबत केमिस्ट्री खूप चांगली आहे. कंगना खूप उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती खूप कष्ट करते. तिच्यासोबत काम करताना खूप चांगले वाटते. दोघींचे काही एकत्र सीन आहेत. सगळ्यांच आमच्या दोन्हींची केमिस्ट्री खूप आवडते. पुन्हा काम करतेय त्यामुळे खूप खुश आहे.’ त्यामुळे सध्या पुन्हा एकदा भाग्यश्रीचा उत्तम अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर तिचे कौतुक करीत आहेत.


हेही वाचा – Video: Bigg Boss 14च्या घरात सिद्धार्थ शुक्लासोबत औरंगाबादची निक्की तांबोळी करतेय…