भूमी पेडणेकर न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत

Mumbai
bollywood actress bhumi pednekar shared nude photo bathtub see photo
भूमी पेडणेकर न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. २०१४ साली तिने ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. त्यावेळेस तिचे ९० किलो वजन होते. मात्र तिने वजन घटविले असून ती आता दिवसेंदिवस बॉल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. सध्या ती एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर बाथटबमधला न्यूड फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत असून चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

July 2020 🐚 #dabbooratnanicalendar

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

हा खास बाथटब मधला न्यूड फोटो तिने फॅशन फोटोग्राफ डब्बू रत्नानीच्या २०२० च्या कॅलेंजरसाठी काढला आहे. या फोटोमध्ये भूमी बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. भूमीने तिचा न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला २ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमी तिच्या चांगल्या अभिनयामुळे चर्चेत असते. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून तिने पदार्पण केल्यानंतर अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत तेव्हा तिचं वजन ९० किलो होत. या संदर्भात भूमी म्हणाली होती की, ‘मी स्वतःला साईज आणि रंगावरून कधीच कमी लेखत नाही. मी स्वतःला नेहमी सेक्सी समजते. ज्यावेळी माझं वजन ९० किलो होत त्यावेळी देखील मी स्वतःला आकर्षक समजत होते. याशिवाय त्यावेळी मी छोटे कपडे परिधान करत होते.’

‘सोनचिरैया’, ‘साँड की आँख’, ‘बाला’ आणि ‘पती पत्नी और वो’ यासारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक करण्यात आलं आहे. यंदाच्या फिल्मफेयर पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पसंती हा पुरस्कार तिने पटकावला आहे.

लवकरच ती ‘भूत’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूत’ या चित्रपटामध्ये ती अभिनेता विकी कौशल याच्यासोबत दिसणार असून ती ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये पुन्हा एकदा आयुष्मान खुराणासोबत दिसणार आहे.


हेही वाचा – अदिती आर्या दिसणार कबीर खानच्या ‘या’ चित्रपटात