मानसिक रूग्णांच्या मदतीसाठी दीपिका विकणार कपडे!

Mumbai

दीपिका पदुकोण दर महिन्याला तीचे कपडे, दागिने विक्रीसाठी आणते. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारी रक्कम नेहमी स्वयंसेवी संस्थांना देते. डिसेंबरमध्ये दीपिका चाहत्यांसाठी खास पार्टीवेअर कलेक्शन आणणार आहे. यातून उभी राहणारी रक्कम मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आणि उपचारांसाठी वापरण्यात येईल. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेक व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात दिला जाणार आहे.

दीपिका नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या तीचा एक डान्सचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दीपिका कार्तिककडून ‘धिमे धिमे’ च्या स्टेप्स शिकताना दिसत आहे.

विमानतळावर दीपिका आणि आर्यन भेटले. यावेळी दीपिकाने विमानतळावरच कार्तिकला ‘धिमे धिमे’ च्या स्टेप्स शिकवण्याची विनंती केली आणि कार्तिकने लगेचच दीपिकाला स्टेप्स शिकवल्या.

लवकरच दीपिकाचा छपाक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ती नवरा रणवीर सिंगबरोबर ८३ चित्रपटातही झळकणार आहे.