आदित्य ठाकरेंसोबत दिशा पटानीची डिनर डेट; चर्चेला उधाण

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे अभिनेत्री दिशा पटानी हिच्याबरोबर दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते तिच्या चित्रपटातील अभिनय असो, तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे किंवा इंस्टाग्राम पोस्टमुळे. काही दिवसांपुर्वीच भारत चित्रपटाची ही अभिनेत्री टायगर श्रॉफला डेट करतेय अशा काही बातम्या ऐकायला येत होत्या. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळीच चर्चा सुरू आहे.

पुन्हा एकत्र आल्याने मैत्रीची चर्चा 

दिशा आणि टायगर श्रॉफ यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने दोघे बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नव्हते मात्र असे असताना अभिनेत्री दिशा आणि युवासेना प्रमुख आदित्य यांच्या भेटीमुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिशाला चांगलेच ट्रोल केले आहे. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते दोघ एकत्र भेटले असून त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नुकतेच अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पुन्हा एकदा ‘डिनर डेट’ला गेले होते. जुहूतील एका हॉटेलबाहेर दोघांना एकत्र असताना त्यांचा फोटो कॅमेऱ्याने कैद केला. हा फोटो सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत असल्याने अनेक माध्यमातून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिशा ट्रोल केल्यानंतर आता अदित्य ठाकरेंसोबत बघतांना तिच्या चाहत्यांना कदाचित आवडले नसल्याने ‘टायगर कहा है’, ‘अब टायगर का क्या होगा’ अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी दिशाला तर ट्रोल केलेच पण आदित्य ठाकरेंना ही नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.

दरम्यान, दिशा पटानी हिचा सलमान खानबरोबरचा भारत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात तिने राधा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दिशाचा फोटो झळकल्यावर नेटिझन्सनी भराभर कमेंट्स करायला सुरुवात केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here