‘आमच्या बाळांना आम्ही टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे’?

मी आतापर्यंत विमानाच्या टॉयलेटमध्ये, कारमध्ये, झाडाच्या मागे काही वेळा तर कॅमेरासमोर देखील माझ्या मुलीला स्तनपान केले आहे. तसेच 'आमच्या बाळांना आम्ही टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे'? असा सवाल देखील तिने उपस्थित केला आहे.

Mumbai
bollywood actress hot neha dhupia revealed her daughter got breastfeed in toilet nodal
स्तनपान

सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांना नोकरी करुन घर सांभाळणे म्हणजे मोठी तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, नोकरी, व्यवसाय करुन देखील स्त्रीला आपल्या बाळाची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर आपल्या बाळाला वेळेवर स्तनपान देता यावे यासाठी आई कोणत्याही ठिकाणी स्तनपान देण्याची तिची तयारी असते. यामध्ये अभिनेत्रीही मागे नाहीत. नुकत्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या मुलीला एका सार्वजनिक ठिकाणी स्तनपान केले असून त्या दरम्यान तिला आलेल्या अडचणी सांगितल्या आहेत. तसेच ‘आम्ही आमच्या बाळांना टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे’? असा सवाल एका अभिनेत्रीने एका मुलाखतीत उपस्थित केला आहे.

ही आहे ती अभिनेत्री

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया हिने हा सवाल उपस्थित केला आहे. ती म्हणाली की, ‘मी आतापर्यंत विमानाच्या टॉयलेटमध्ये, कारमध्ये, झाडाच्या मागे काही वेळा तर कॅमेरासमोर देखील माझ्या मुलीला मेहेरला स्तनपान केले आहे. पण मला, असे वाटते की आम्हाला आमच्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी चांगली जागा मिळायला हवी. आमच्या बाळांना आम्ही टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे?’ असे नेहाने विचारले आहे. तसेच ‘मुलांना निरोगी ठेवण्यासाठी स्तनपान हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे लोकांनी यावरुन कोणाबद्दलही चुकीची मते तयार करु नये, कारण प्रत्येक महिला, प्रत्येक आईसाठी परिस्थिती वेगवेगळी असू शकते’, असे देखील नेहा पुढे म्हणाली आहे.

#Freedomtofeed मोहिम

काही दिवसांपूर्वी नेहा धूपियाने #Freedomtofeed मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत ती पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांनी बाळाला काय खायला द्यावे आणि काय देऊ नये याबाबत जागरुक करते. तसेच तिच्या या मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.


हेही वाचा – विकी कौशलला उत्सुकता आहे ‘या’ मराठी चित्रपटाची!