Viral Video: माधुरीनं केला साडीवर बेली डान्स; चाहते झाले घायाळ

Viral Video: माधुरीनं केला साडीवर बेली डान्स; चाहते झाले घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं आपल्या अभियनाबरोबरचं आपल्या डान्सनं देखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशी कोणतीच डान्स स्टेप नाही, जी माधुरी करू शकली नाही. याचा पुरावा एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जबरदस्त अंदाजात ‘ओ वुमनिया’ गाण्यावर माधुरी बेली डान्स करताना दिसत आहे. खास म्हणजे तिने हा बेली डान्स साडीवर केला आहे. माधुरीचा हा डान्स पाहून प्रेक्षकं आणि जज जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

माधुरीचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजवरील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते अक्षरशः चाहते घायाळ झाले आहेत.

माधुरी दीक्षित सध्या घर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. माधुरी फोटो आणि व्हिडिओ सतत चाहत्यांसाठी शेअर करत असते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर माधुरी गेल्या वर्षी दोन बॉलीवूड चित्रपटात दिसली होती. ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटात माधुरी दिसली होती. या दोन्ही चित्रपटात माधुरीचा अनोखा अंदाज पाहायला मिळाल. याशिवाय माधुरीने ‘डान्स दीवाने’ शोमध्ये जज म्हणून होती. सध्या या दिवसांमध्ये ती अनेक Activity करताना दिसते. त्याचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.


हेही वाचा – बिपाशा बासूने स्वतः चा हॉट & बोल्ड फोटो केला शेअर आणि…