घरमनोरंजनप्रियांका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; युनिसेफने दिला मानवतावादी पुरस्कार

प्रियांका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; युनिसेफने दिला मानवतावादी पुरस्कार

Subscribe

न्यूयॉर्कचा प्रतिष्ठित मानला जाणारा 'यूनिसेफ स्नो फ्लेक बॉल' या सोहळ्यात प्रियांकाने हा पुरस्कार स्वीकारला

बॉलिवूड विश्वापासून ते हॉलिवूडपर्यंत भारताचे नाव रोशन करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला युनिसेफकडून डॅनी काये ह्यूमॅनिटेरियन अवॉर्डने (मानवतावादी पुरस्कार) सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्कचा प्रतिष्ठित मानला जाणारा ‘यूनिसेफ स्नो फ्लेक बॉल’ या सोहळ्यात प्रियांकाने हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराची घोषणा जून महिन्यातच करण्यात आली होती. युनिसेफकडून प्रियांका चोप्राला या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

- Advertisement -

प्रियांका चोप्रा गेल्या कित्येक दिवसांपासून युनिसेफसोबत जोडली गेली आहे. तसेच युनिसेफ सोबत काम देखील करत आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका वन शोल्डर गाऊनमध्ये उपस्थित होती. यावेळी तिने अनेकांचे मन जिंकले. प्रियांका नेहमीच इन्स्टाग्रामवर युनिसेफशी संबंधित अनेक उपक्रमांचे फोटो शेअर करत असते. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असल्याने प्रियांकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रियांका अनेक वर्षांपासून युनिसेफची सदिच्छा दूत देखील राहिली आहे. प्रियंकाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आता समाजसेवा करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. तसेच युनिसेफसाठी प्रथमच सदिच्छा दूत म्हणून काम करणार्‍या अमेरिकन अभिनेते आणि समाजसेवक डॅनी काय यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे.


प्रियांका-निकच्या घरात नव्या पाहुण्याचे स्वागत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -