रवीना टंडन डिजिटल माध्यमात पदार्पण करणार

bollywood actress raveena tandon is ready for digital debut
रवीना टंडन डिजिटल माध्यमात पदार्पण करणार

वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक जुन्या कलाकारांनी पुन्हा अभिनय क्षेत्राकडे पाउल टाकले आहे. अनेक नवीन आणि जुने बॉलिवूडचे कलाकार पुन्हा डिजिटल माध्यमातून पदार्पण करत आहेत. लारा दत्ता आणि सुष्मिता सेन या अभिनेत्रीनंतर आता रवीना टंडन देखील डिजिटल माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहे. रवीना टंडनच्या वेबसीरिजच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रवीना टंडन पहिल्या वेबसीरिजच्या शूटिंगसाठी हिमाचाल प्रदेशमधील दल्हौसिये येथे पोहोचली आहे. ४५ वर्षीय अभिनेत्रीने याबाबत सांगितले की, ‘कोरोना संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करुन वेबसीरिजमधले कलाकार आणि क्रू डोंगराळा प्रदेशात पोहोचत आहे. मी पुन्हा शूटिंगला सुरुवात करत आहे. आम्ही सर्वप्रकारची काळजी घेतल आहोत. कोरोना संदर्भातल्या नियमांचे पालन करत आम्ही प्रवास करत आहोत.’

या वेबसीरिज व्यतिरिक्त रवीनाचा आगामी चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’चे पण शूटिंग सुरू झाले आहे. याबाबत चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता यश यांने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. रविना टंडन ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्या काळात मोहरा, अंदाज अपना अपना, लडला, दुल्हे राजा, आक्स, दामन, सत्ता असे अनेक जबरदस्त चित्रपटात तिने काम केले आहे.