घरमनोरंजनअभिनेत्रीच्या खोलीत शिरला माकड; झाली मोठी तारांबळ

अभिनेत्रीच्या खोलीत शिरला माकड; झाली मोठी तारांबळ

Subscribe

सकाळच्या वेळेस बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्या शर्माच्या खोलीत एक माकड शिरला आणि सर्व सामान इकडेतिकडे करु लागला. सौंदर्याने त्याला नाश्ता दिला. मात्र, तरीही तो खोली बाहेर गेला नाही. उलट तो तिच्या बेडवर झोपला, असे सौंदर्या म्हणाली आहे.

‘रांची डायरीज’ या चित्रपटाची अभिनेत्री सौंदर्या शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड तिच्या घरात शिरला असल्याचे दिसत आहे. हा माकड फळे खाताना दिसत आहे. याशिवाय तो सामान इकडे-तिकडे देखील करत आहे. या व्हिडिओसोबत सौंदर्याने म्हटले आहे की, ‘ठगलाईफ… हा माकड सकाळी माझ्या खोलीत घुसला. त्याला नाश्ता दिल्यानंतरही तो बाहेर गेला नाही. नाश्ता केल्यानंतर त्याने माझ्या बेडवर आराम केला. मी फक्त ओरडत होते आणि याचा व्हिडिओ बनवत होते. कारण त्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता.’

- Advertisement -

कोण आहे सौंदर्या शर्मा?

बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्या शर्माने २०१७ साली आलेल्या रांची डायरीज या चित्रपटाच्या मार्फत बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कामावरुन तिला सिने अवॉर्ड्स आणि स्टार सिने अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटात हिमांश कोहली आणि अनुपम खेर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. सौंदर्या आपले बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांच्या भरपूर लाईक्स आणि कमेंट येतात.

 

View this post on Instagram

 

Hey You!

A post shared by Soundarya Sharma (@iamsoundaryasharma) on

 

View this post on Instagram

 

Sometimes I Pose, But Sometimes I pose as Posing ??‍♀️??⚡️

A post shared by Soundarya Sharma (@iamsoundaryasharma) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -