घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री तनुजा लिलावती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा लिलावती रुग्णालयात दाखल

Subscribe

७५ वर्षीय तनुजा यांना ओटीपोटात वेदना होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या घरात दुखःद वातावरण आहे. २७ मे रोजी सकाळी अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले होते. यावेळी अजय देवगण आणि काजोलची आई तनुजासह संपुर्ण कुटुंब उपस्थित होता.

अशातच कुटुंब वीरू देवगण यांच्या निधनाच्या दुखःतून सावरत असताना लगेच ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७५ वर्षीय तनुजा यांना ओटीपोटात वेदना होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

तनुजा यांची मुलगी अभिनेत्री काजोल हिचे लिलावती रुग्णालयात जातानाचे फोटो व्हायरल झाले. काजोलचे सासरे विरु देवगण यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यानंतर काजोलनं इतक्या तातडीनं लिलावती रुग्णालय का गाठले अशा चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -