Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन यावर्षी मोठ्या पडद्यावर या 'जोड्या' झळकणार

यावर्षी मोठ्या पडद्यावर या ‘जोड्या’ झळकणार

सेलिब्रिटींच्या नव्या जोड्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे २०२० हे वर्षे मराठीसह बॉलिवूड चित्रपट सृष्टीसाठी आव्हानात्मक होते. अनेक बिग बजेट सिनेमे तयार असून प्रदर्शित होऊ शकले नाही. मात्र यावर्षी अनेक सिनेमे प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले असून प्रेक्षकांना यंदा नव्या सिनेमांची मेजवानी पाहयला मिळणार आहे. परंतु या नव्या सिनेमांमधून प्रेक्षकांनाही काहीतरी नवं पाहयला मिळणार आहे. कारण यावर्षी अनके नव्या सेलिब्रिटीसच्या जोड्या प्रथमचं स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. चला तर तर चला पाहूया कोणत्या नव्या सेलिब्रिटी जोड्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत.

श्रद्धा कपूर – रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच लव रंजन यांचा आगामी ‘लव रंजन’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. ‘लव रंजन’ हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून श्रद्धा प्रथमचं रणबीरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

- Advertisement -

दिपीका पादुकोण – प्रभास
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी अॅक्शन सिनेमात प्रभास आणि अभिनेत्री दिपीका पादुकोण पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. याव्यतिरिक्त बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील प्रभास आणि दिपीकासोबत स्क्रिन शेअर करतील. प्रभासोबतचा दिपीकाचा हा पहिलाच सिनेमा आहे.

जॅकलीन फर्नाडिस – रणवीर सिंह
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आगामी सर्कस या सिनेमा प्रथमचं अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि रणवीर सिंह ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रसिद्ध नाटककार शेक्सपियर लिखित कॉमेडी ऑफ एरर्स यावर आधारित ‘सर्कस’ सिनेमाची कथा असल्याने प्रेक्षकांना यातून काहीतरी भन्नाट कॉमेडी पाहयला मिळणार आहे.

- Advertisement -

दिपीका पादुकोण – सिद्धांत चतुर्वेदी
अभिनेत्री दिपीका पादुकोण यंदा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यातच शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी सिनेमात दिपीका प्रथमचं सिद्धांत चतुर्वेदीसोबत मोठ्या स्क्रिनवर झळकणार आहे. विशेष म्हणजे दिपीका प्रथमचं सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करणार आहे.

अनन्या पांडे – विजय देवरकोंडा
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे पहिल्यांच्या एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे. अद्याप या सिनेमाचे नाव जाहीर करण्यात आले नाही परंतु या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनन्यासह विजय देखील दिसत आहे.

कतरिना कॅफ – सिद्धांत चतुर्वेदी

अभिनेत्री कतरिना कॅफ आणि सिद्धांत चतुर्वेदी ही नवी कोरी जोडी एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्साही आहेत. सुपर नॅचरल कॉमेडी सिनेमा ‘फोन बूथ’मधून ही जोडी मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात दोघेही भूतच्या अवतारात दिसणार आहेत.

अक्षय कुमार – सारा अली खान
बॉ़लिवूडमधील आगामी ‘अतरंगी रे’ या सिनेमातून अक्षय कुमार आणि सारा अली खान ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहेत. अक्षय आणि सारा यांच्या जोडीसह साऊथ सुपरस्टार धनुष देखील पहिल्यांच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

रणबीर कपूर – अलिया भट्ट
बॉलिवूडमधील बहुचर्चित लवबर्डस कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आगामी ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमातून एकत्र झळकणार आहे. रणबीर आणि आलियासह बॉलिवूडचे शेहनशा अमिताभ बच्चन देखील दिसणार आहे.

 

- Advertisement -