Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अलियाचा 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

अलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

Related Story

- Advertisement -

नवीन वर्षाच्यानिमित्ताने अभिनेता रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट रणथंभोरमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पण सध्या आलिया संजय लीला भन्सालीचा चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आलियाचा हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, याबाबत भन्साळी प्रोडक्शनने सांगितले आहे.

संजय लीला भन्साळीचा चित्रपट नेहमी एक वेगळ्या व्हिज्युअल एक्सपीरिएंस देतो. भव्य सेट, सिनेमॅटोग्राफी आणि संगीत यामुळे भन्साळीचा चित्रपट नेहमीच चर्चेत असतो. अशा परिस्थितीत त्याच्या चित्रपटांचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मोठा पडदा. आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ हा माफिया क्वीन असलेल्या गंगुबाईच्या जीवनावर आधारित आहे. सध्या मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे.

- Advertisement -

या चित्रपटाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, ‘भन्साळींच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे हा देखील एक उत्तम चित्रपट असेल. गंगुबाईच्या भूमिकेत असलेल्या आलिया भट्टचे मोशन पोस्टर शेअर करत भन्साळी प्रोडक्शनने ट्विट केले आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे भन्साळी प्रोडक्शनने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राजस्थानच्या रणथंभोर येथे गेली होती. यावेळी नीतू कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान होती. विशेष म्हणजे यादरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण देखील येथे पोहोचले.


हेही वाचा – अभिनवची दुसरी बायको होण्यासाठी राखीने मागितला नवऱ्याकडून तलाक!


 

- Advertisement -