घरताज्या घडामोडीAmitabh Bachchan: 'अपने स्वच्छ मुख को स्वच्छ रखिए...युजर्ला अमिताभ यांनी चांगलेच झापले'

Amitabh Bachchan: ‘अपने स्वच्छ मुख को स्वच्छ रखिए…युजर्ला अमिताभ यांनी चांगलेच झापले’

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांनी एका हेटर्सला झापल्याचे समोर आले आहे.

‘तू कोरोनाने मेलास तर बरा…’, असे म्हणाऱ्या एका हेटर्सला अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशाच एका हेटर्सला अमिताभ बच्चन यांनी झाप झाप झापल्याचे समोर आले आहे. ‘सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावे’, अशा शब्दांत अमिताभ यांनी या ट्रोलरची बोलती बंद केली आहे.

- Advertisement -

बिग बीं यांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर गेल्या २३ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, आता त्यांनी कोरोनावर मात केली असून ते बरे होईन घरी परतले आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तर ‘अमूल’ने अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास असे कार्टून प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे अमूलच्या कार्टूनला अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर करत आभार देखील मानले आहेत. दरम्यान, ‘वर्षोंसे अमूलने सन्मानित किया है मुझे. एक साधारण शक्तियत को अमूल बना दिया मुझे’, असे या कार्यूनवर प्रतिक्रिया देताना अमिताभ यांनी लिहिले. यानंतर त्यांच्या पा पोस्टवर लोकांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले. मात्र, याच दरम्यान एक युजर नको के बरळला आहे आणि अमिताभ बच्चन यांनी देखील त्या युजर्ला झापले.

- Advertisement -

काय म्हणाला युजर

‘मुफ्त में तो अमूल्य नहीं बने होंगे…तय रक्कली होगी’, अशी शब्दांत या युजरने अमिताभ यांना ट्रोल केले. त्यावर अमिताभ देखील भडकले आणि त्याचा खरपूस समाचार घेतला. ‘बहुत बडी गलतफहमी में चल है आप मियां…जब सच ना मालून हो तो अपने स्वच्छ मुख को स्वच्छ रखिए’,असे उत्तर दिले आहे.

‘तसेम मी या कार्टूनसाठी अमूलला विनंती केली नाही. बाण सेडण्याआधी थोडा तर नीट विचार करावा. नाहीतर तो बाण तुमच्यावर येऊन पडेल. जसे की आता झालेय. मी बाण म्हटले आहे. पण, बाणाच्या जागी एक वेगळी म्हण आहे. तो अन्य पदार्थांचे वर्णन करतो. माझे सभ्य संस्कार मला त्याचे वर्णन करण्यापासून मला रोखून धरलेय’, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – ‘मुंबई पोलीस गप्प का, आम्ही प्रश्न तर विचारणारच’; बिहार पोलीस महासंचालक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -