Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; ३४ तासांत ११ सेलिब्रिटी पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; ३४ तासांत ११ सेलिब्रिटी पॉझिटिव्ह

Mumbai
bollywood bachchan and kher family corona positive parth samthaan tv actor
बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; ३४ तासांत ११ सेलिब्रिटी पॉझिटिव्ह

देशभरात कोरोना विषाणूचा कहर चार महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. देशात सातत्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या जीवघेण्या विषाणूबाबत लोकांना सतत इशारा देणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन स्वतः कोरोनाचा शिकार झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन कुटुंबियांनंतर बॉलिवूडमधील अनेक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

अमिताभ बच्चन यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चनला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर बच्चन कुटुंबातील उर्वरित सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. फक्त जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतः ट्विटरद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. अनुपम खेर यांच्या आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय त्यांच्या मेव्हणी आणि भाचीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच टीव्ही सीरियल ‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेता पार्थ समनाथ याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ‘कसोटी जिंदगी की’ या सीरियलचे चित्रिकरण बंद झाले आहे. तसेच ‘उंगली’ फेम अभिनेत्री रेचल व्हाइट हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. बालाजी टेलिफिल्म्सचे कार्यकारी उपाध्यक्ष तनुश्री दासगुप्ता यांचाही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यांना डिस्जार्च देण्यात येणार आहे.


हेही वाचा – कपूर घराण्याची ऐतिहासिक हवेली कोसळण्याची शक्यता