कपिल शर्मा होणार पुन्हा बाबा

bollywood comedian and actor Kapil Sharma to become a father again
कपिल शर्मा होणार पुन्हा बाबा

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आपल्या कुटुंबातील नवा सदस्याचे स्वागत करण्यासाठी तयारी करत आहे. कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा बाब होणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ प्रेग्नेंट असून जानेवारी २०२१ मध्ये तिची डिलीव्हरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिन्नीची काळजी घेण्याची कपिल शर्माची आई मुंबईत पोहोचली आहे. त्याचे कुटुंब प्रेग्नेंसीच्या शेवट्या तीन महिन्यांत काळजी घेण्यासाठी गिन्नीसोबत राहत आहे.

सध्या गिन्नीला सहा महिने पूर्ण झाले आहे. अलीकडेच करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

कपिल शर्माला आता दुसरे मुलं होणार आहे. कपिल शर्माला पहिली क्यूट मुलगी आहे, जिचे नाव अनायरा आहे. ती १० डिसेंबरला १ वर्षांची होईल. मग १० डिसेंबरनंतर १२ डिसेंबरला कपिल आणि गिन्नी आपला दुसरा लग्नाचा वाढदिवस साजरा करतील. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आपल्या पत्नीसोबत अमृतसरच्या गोल्ड टेम्पलमध्ये दिसला होता.कपिलने लॉकडाऊन दरम्यान नवा लूक केला.

लॉकडाऊन नंतर कपिल शर्मा खूप स्लिम आणि हँडसम दिसत आहे. माहितीनुसार त्याने लॉकडाऊन दरम्यान ११ किलो वजन कमी केला आहे. लॉकडाऊनपूर्वी कपिलचे वजन ९२ किलो होते त्यानंतर त्याने वजन कमी करून त्याचे वजन ८१ किलो झाले आहे. सध्या तो एका वेबसीरिज शूटिंग करत आहे.