बॉलिवूडचे निर्माते नाडियाडवाला यांच्या घरी NCBचा छापा

bollywood drugs connection ncb raid in producer firoz nadiadwala house
बॉलिवूडचे निर्माते नाडियाडवाला यांच्या घरी NCBचा छापा

बॉलिवूडचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी नारकोटिक्स विभागाने (NCB) छापा टाकला आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास एनसीबीच्या आधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी नाडियाडवाला यांच्या घरातून एक सूडकेस आणि बॉक्स जप्त केला आहे. यामध्ये १० ग्रॅम गांजा आणि तीन मोबाईल फोन जप्त केल्यांची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. तसेच आता लवकरच एनसीबी नाडियाडवाला यांना समन्स बजावणार आहे. दरम्यान एनसीबी ऑफिसमध्ये फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, ज्यावेळी फिरोज यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला त्यावेळेस फिरोज घरी नव्हते.

एनसीबी ७-८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून एनसीबी काही ड्रग्ज पेडलरच्या घरी छापे टाकत होती. याप्रकरणी आतापर्यंत ५ ड्रग्ज पेडलर एनसीबीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान निर्मात्याचे नाव समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी नवी मुंबई आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकले, तेथून एजन्सीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. या छाप्यात एनसीबीने चार जणांना अटकही केली होती, ज्यांची चौकशी सुरू आहे.

हे माहित आहे की निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांच्या निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. यामध्ये २००६ मध्ये फिर हेरा फेरी, आवारा पागल दीवाना, ऑन: मेन अॅट वर्क, फूल अँड फाईनल, वेलकम, कारतूस अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.


हेही वाचा – जो बायडेन यांना कंगना रनौत म्हणाली ‘गजनी’