धर्मासाठी आयुष्य वाहिलेल्या सना खानने मौलानासोबत केलं लग्न

सना खानने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन दिली लग्नाची माहिती

बॉलिवूडची एकेकाळची अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वीच तिने बॉलिवूडला अलबिदा करत इस्लाम धर्मासाठी आपले आयुष्य वेचणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता तिने मुफ्ती अनससोबत लग्न केले आहे. लग्नानंतर सनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले. सध्या तिच्या या फोटोवरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे. तसेच कॅप्शनमध्ये तिने मुफ्ती अनस यांच्यासोबत निकाह का केला? याचेही उत्तर दिले आहे.

सना खानने आपल्या लग्नाचा एक व्हिडिओ देखील इन्स्टावर पोस्ट केला. ज्यामुळे तिने लग्न केले असल्याचे समोर आले. आता तिने लग्नाच्या जोड्यातला फोटोही पोस्ट केला आहे. यात तिने लिहिले आहे की, “आम्ही एकमेकांसोबत प्रेम केले अल्लाह साठी, लग्न केले ते अल्लाहसाठी. अल्लाह आम्हाला या जगात एकत्र ठेवलेच, त्याशिवाय जन्नतमध्येही आम्हाला एकत्र ठेवेल.” अशी प्रार्थनाही तिने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

सनाने २० नोव्हेंबर रोजी लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर तिने आपले नाव बदलून सयैद सना खान केले आहे. तिच्या पतीचे नाव मुफ्ती अनस सयैद असून ते एक मौलाना आहेत. गुजरातमधील सूरत येथे ते राहत असल्याची माहिती मिळत आहे. अनस सयैद सोबत सना खानची ओळख झाली कशी? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस फेम एजाज खान याने सना खानची ओळख अनस सयैदसोबत करुन दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by sanakhan (@fan_of_sana_khan_)

ऑक्टोबर महिन्यात सना खानने बॉलिवूड आणि तारांकित दुनियेचा निरोप घेतला होता. बुरखा घातलेला एक फोटो अपलोड करत सनाने पुढचे आयुष्य, मानवता आणि धर्माच्या मार्गावर चालण्यात घालविणार असल्याचे सांगितले होते. सनाने जय हो, टॉयलेट एक प्रेम कथा, धन धना धन गोल, अशा चित्रपटांमधून अभिनय केलेला आहे. काही टीव्ही मालिकांमधूनही ती झळकली होती. तसेच बिग बॉस, झलक दिखला जा आणि फियर फॅक्टर सारख्या रिअॅलटी शोजमध्येही सनाने भाग घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)