घरमनोरंजनसईच्या 'या' भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये आहे तिची चर्चा!

सईच्या ‘या’ भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये आहे तिची चर्चा!

Subscribe

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवत आहे. नुकताच सईचा 'लव सोनिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'लव सोनिया' या चित्रपटातील सईच्या भूमिकेमुळे सध्या बॉलिवूडमध्ये सईचीच चर्चा आहे.

‘लव सोनिया’ सिनेमा रिलीज झाल्यावर सध्या सर्वत्र चर्चा आहे ती अभिनेत्री सई ताम्हणकरची! ‘लव सोनिया’तील सईच्या ‘अंजली’ या लक्षवेधी भूमिकेमुळे तिची प्रशंसा होत आहे. ‘लव सोनिया’ बघितलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडी सध्या मराठमोळ्या सईचंच नाव आहे. सईचा ही वेगळी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. बॉलिवूडमधल्या सध्या आघाडीवर असलेल्या कॅटरीना कैफ, अनिल कपूर, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी ‘लव सोनिया’ सिनेमा पाहिल्यावर सईचं भरभरून कौतुक केलं आहे. एवढंच नाही, तर अनेक समीक्षकांनीही सिनेमा पाहिल्यावर सईची स्तुती केली आहे.

‘लव सोनिया’ सिनेमातला सईचा सहज वावर, आत्मविश्वास बॉलीवूड चाहत्यांची मनं जिंकून गेला. सईने मराठी चित्रपटांप्रमाणेच गजनी, ब्लॅक अॅण्ड व्हाइट, हंटर या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र ‘लव सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात फ्रिडा पिंटो, डेमी मोर सारखे कलाकार असताना आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडकरांवर सोडणं, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘लव सोनिया’मुळे सईने बॉलीवुडलाच नाही, तर वर्ल्ड सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आपण एक सशक्त अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलंय.

- Advertisement -

‘फेमिना’च्या कव्हर पेजवर आलेली आणि ‘सॅवी’ हा नामांकित पुरस्कार प्राप्त असलेली पहिली मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर जेव्हा ‘लव सोनिया’सारखा आंतरराष्ट्रीय सिनेमा करून बॉलिवुडकरांचं लक्ष वेधून घेते, तेव्हा निश्चितच मराठी प्रेक्षकांना तिचा अभिमान वाटतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -