घरमनोरंजन'तांडव' दिग्दर्शक अली अब्बासवर भडकली कंगना

‘तांडव’ दिग्दर्शक अली अब्बासवर भडकली कंगना

Subscribe

बोल अली अब्बास जफर हिंमत आहे का अल्लाहची थट्टा उडवण्याची? असे म्हणत कंगानाने निर्माते अली अब्बासवर टीका केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अॅमेझॉन प्राईमवरील तांडव वेबसिरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरिजमधील एका दृश्यावरुन वाद विवाद सुरु असून निर्मात्यांवर अनेक ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप ठेवत या वेबसिरिजला विरोध केला जात आहे. आता तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांने याबाबत जाहिर माफी मागितली आहे. परंतु अभिनेत्री कंगना रानौत हीने आता निर्माते अली अब्बास यांच्या हल्ला चढवला आहे.
कंगानाने भाजपा नेते कपिल मिश्रा यांचे ट्विट शेअर करत लिहिले की, माफी मागण्यासाठी तू वाचला कुठे आहेस? हे सरळ गळा कापून जिहादी देशाचा फतवा काढत आहे. आणि लिब्रु मिडिया वर्चुअल लिंचिंग करत आहे. तुझा फक्त जीव घेतला जाणार नाही तर तुझ्या मृत्यूलाही जस्टीफाय केले जाईल. बोल अली अब्बास जफर हिंमत आहे का अल्लाहची थट्टा उडवण्याची? अशी म्हणत कंगनाने राग व्यक्त केला आहे.

याआधी भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट केलं होत की, अली अब्बास जफर कधी तुमच्याही धर्मावर चित्रपट तयार करत माफी मागा. सारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आमच्याच धर्माबाबत का करता? कधी तुमच्या धर्माचाही थट्टा उडवत लाजिरवाने व्हा. तुमच्या शिक्षेची किंमत तुम्हाला भारताचा कायद्याप्रमाणे भोगावी लागले. वादग्रस्त दृश्ये मागे घ्या, तांडव वेबसिरिजला रद्द करावेच लागेल. याचबरोबर भाजपाचे उत्तर पुर्व मुंबई विधानसभा सदस्य मनोज कोटक, मध्य प्रदेशमधील विश्वास सारंग व राज्य विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष रामेश्वर शर्मासह अनेक भाजपा नेत्यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सुचना करत वेबसिरिज बंद करण्याची मागणी केली आहे.
तांडव ही वेब सिरिज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही लक्षात घेत आहोत. या वेब सिरिजमधील एका सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता आम्ही या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत. तांडव ही वेब सिरिज पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.

- Advertisement -

काय आहे तो सीन?

तांडव वेबसिरिजमध्ये (Tandav Webseries) अभिनेता जीशाय अयूब हा नारदाच्या व्यक्तिरेखा असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की, ‘भगवान काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतयं की आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान असे म्हणतो की, मग काय करू, बदलू का? त्यावर त्याला नारद म्हणतो की, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -