घरमनोरंजन'या' अभिनेत्रीने नेसवली तिच्या गोंडस मुलीला साडी; फोटो व्हायरल

‘या’ अभिनेत्रीने नेसवली तिच्या गोंडस मुलीला साडी; फोटो व्हायरल

Subscribe

लीसाने ज्यावेळी तिच्या मुलीचे फोटो शेअर केले त्यावेळी तिच्यापेक्षा तिच्या मुलींचे सगळ्यात जास्त फॅन झाले.

बॉलिवूड विश्वातील नावाजलेली अभिनेत्री नुकतीच चर्चेत आली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अभिनेत्री लीसा रे. ही अभिनेत्री चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा आगामी कोणता चित्रपट नव्हे किंवा तिचे नवे फोटोशूट नव्हे. अभिनेत्री लीसाने सोशल मीडियावर नुकतेच आपल्या लहानग्या मुलीचा पारंपारिक वेशातील एक फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

अवघ्या एका वर्षाच्या गोंडस जुळ्या मुलींचे इंस्टाग्रामवर अभिनेत्री लीसाने शेअर केले आहे. लीजाने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने काहीच क्षणात ते सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय. या फोटोमध्ये लीजाने तिच्या मुलीला लहानशी लाल रंगाची साडी नेसवली असून तिच्या कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली लावल्याचे या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसत आहे. या पेहरावात अभिनेत्री लीजाची मुलगी खूपच गोड दिसत असून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

या अभिनेत्रीला दोन गोड मुली असून लीसा नेहमीच तिच्या दोन्ही मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. लीसाने ज्यावेळी तिच्या मुलीचे फोटो शेअर केले त्यावेळी तिच्यापेक्षा तिच्या मुलींचे सगळ्यात जास्त फॅन झाले. या फोटोला लीसाने सुंदर असे कॅप्शन दिल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -