Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जबरदस्त एक्शन सीन्सचा 'द पावर' पॅक्ड् ट्रेलर लॉंच

जबरदस्त एक्शन सीन्सचा ‘द पावर’ पॅक्ड् ट्रेलर लॉंच

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा Action हिरो विद्युत जामवालाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतात. यातचं त्याचा आगामी Action, फ्री स्टाइल फाईटींगचे पॅकेज असलेला ‘द पावर’ सिनेमाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. या ट्रेलरमध्ये विद्युत जामवाल आणि अभिनेत्री श्रृती हासनचा रोमांस, आणि तगडे फाइटिंग सीन्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त हीट ठरत आहे. विद्युतच्या ‘खुदा हाफिज’ या सिनेमाप्रमाणे ‘द पावर’ सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘द पावर’ सिनेमाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या ट्रेलरमधून विद्युतचे पावरफुल स्टंड, Action सीन्स पाहायला मिळत आहेत. Action सह विद्युतचे श्रृती हासनसोबत असलेले रिलेशन आणि रोमांन्स आणि त्यानंतर एका वळणावर बदला घेण्यासाठी सुरु होणारी घडपड अशी या सिनेमाची कथा असणार आहे. या ट्रेलरमधील श्रृतीचे सोजवळ, डॅशिंग अंदाज पाहण्यासारखे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

- Advertisement -

‘द पावर’ या सिनेमाचा २ मिनिट ३८ सेकंदाचा ट्रेलर आजचं प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरची सुरुवात विद्युत आणि श्रृतीच्या रोमँटिक सीन्सने होते. दरम्यान श्रृतीसोबत एक भयानक घटना घडते आणि सुरु होतो बदला घेण्याचा प्रवास. हा बदला घेण्याच्या प्रवासात विद्युत श्रृतीला साथ देतो. त्यानंतर एकंदरीत विद्युत जामवाल जबरदस्त Action आणि स्टंड करताना दिसत आहे. या पावरपॅक ट्रेलरवरून तरी सिनेमा हीट ठरेलं यात शंका नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून सिनेमाची कथा ९० च्या दशकातील बँकग्राउंडमध्ये चित्रित करण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेता विद्युत, श्रृतीच्या मुख्य भूमिकेसह अभिनेता प्रतिक बब्बर देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा १४ जानेवारीला ZEE 5 या ओटीटी प्लटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी प्रेक्षकांना थिएटरच्या तिकीटप्रमाणे १९९ रुपये मोजावे लागणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -