‘राज तिलक’ चित्रपटाचे निर्माते अनिल सुरी यांचे निधन

कोरोनामुळे 'राज तिलक' चित्रपटाचे निर्माते अनिल सुरी यांचे निधन झाले आहे.

Mumbai
bollywood producer anil suri died due to coronavirus
'राज तिलक' चित्रपटाचे निर्माते अनिल सुरी यांचे निधन

‘कर्मयोगी’, ‘बेगुनाह’ आणि ‘राज तिलक’ या चित्रपटांचे निर्माते अनिल सूरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, चित्रपट निर्माते राजीव सूरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनिल सुरी यांचे भाऊ राजीव सूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल सूरी यांना २ जूनपासून ताप येत होता. तसेच त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. त्यामुळे त्यांना सुरुवातीला लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र, या दोन्ही रुग्णालयांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना ३ जून रोजी रात्री अॅडवान्स मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याना व्हेंटिलेटरवर ठेण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांचा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सूरी कुटुंबातील चार जण उपस्थित होते.

अनिल सूरींचे गाजलेले चित्रपट

‘कर्मयोगी’ या चित्रपटाची निर्मित १९७८ करण्यात होती. त्यावेळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये राज कपूर, जितेंद्र आणि रेखाने अभिनय केला होता. तर त्यांचा ‘राज तिलक’ चित्रपट देखील चांगला गाजला होता. या चित्रपटामध्ये सुनील दत्त, राज कुमार, हेमा मालिनी, धर्मेद्र, रीना रॉय, सारिका आणि कमल हसन यांनी अभिनय केला होता.


हेही वाचा – राज्यात तीन महिन्यात ८० हजार करोना रुग्ण