घरताज्या घडामोडीVideo: अमेरिकेत रोनित रॉयचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या नेमकं यामागचं कारण

Video: अमेरिकेत रोनित रॉयचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या नेमकं यामागचं कारण

Subscribe

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता रोनित रॉय यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ भारतपेक्षा अमेरिकेत जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेतील आंदोलनकर्ते हा व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त शेअर करत आहेत. रोनितच्या या व्हिडिओला दोन मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

वास्तविक रोनित रॉयने २० एप्रिलला हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यावेळी भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यावर होता. तसेच त्या दरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्याच वेळेस रोनितने टी-शर्टचा वापर मास्कसाठी कसा करायचा? याबाबत व्हिडिओ तयार केला आणि तो ट्विटवर शेअर केला. पण हा व्हिडिओ अमेरिकेत का व्हायरल होतोय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

- Advertisement -

या कारणामुळे रोनिताचा व्हिडिओ होतोय व्हायरल

रोनितचा हा व्हिडिओ अमेरिकेत व्हायरल होण्यामागचे एक विशिष्ट कारण आहे. अमेरिकेत सध्या हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती चिघळत असल्यामुळे सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपवले होते. तसेच यामुळे अमेरिकेच्या ४० हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आंदोलनकर्ते हा व्हिडिओ शेअर करत सांगत आहे की, ‘जर आपल्याकडे मास्क नसेल तर अशा प्रकारे मास्क तयार करून घाला. यामुळे आंदोलना दरम्यान तुम्ही तुमचा चेहरा लपवू शकता.’ यामुळे सध्या रोनितचा व्हिडिओ अमेरिकेत व्हायरल होत आहे.

- Advertisement -


हेही वाचा – चिमुकल्याची आपल्या मृत आईला उठवण्याची धडपड, व्हिडिओ पाहून किंग खानने केली मदत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -