घरमनोरंजनvideo : 'या' खास महिलेसोबत केला सलमानने रोमँटिक गाण्यावर डान्स

video : ‘या’ खास महिलेसोबत केला सलमानने रोमँटिक गाण्यावर डान्स

Subscribe

सध्याचा सलमान खानचा एक व्हिडिओ खुपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एका महिलेसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

दबंग सलमान खान सध्या सोशल मीडियावर खुपच अॅक्टिव्ह झाला आहे. फक्त व्यावसायिकच नव्हे तर वैयक्तीक व्हिडिओदेखील सलमान खान त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर करू लागले आहेत. त्यांचा सध्याचा व्हिडिओ तर खुपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एका महिलेसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई सलमा खान आहे. या व्हिडिओत चीप थ्री हे गाणं बॅकग्राऊंडला सुरु आहे. तर दोघही मायलेकाची केमिस्ट्री डान्सच्या वेळी पाहायला मिळत आहे. आई सलमा यांचा सलमान किती लाडका मुलगा आहे, हे या व्हिडिओत दिसून येत आहे. तर सलमानने या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आई म्हणतेय बंद करा हे नाच-गाणं, अशी कॅप्शन दिली आहे.

View this post on Instagram

Mom is saying band karo yeh naach ganna..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

दबंग ३ चे चित्रीकरण सुरु 

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या एका चाहतीचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमानची जबरदस्त फॅन असणारी मुलगी आपल्या पायांच्या सहाय्याने सलमानचे चित्र रेखाटत आहे. या व्हिडिओला सलमानच्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील ‘तेरी चुनरिया’ हे गाणं ऐकायला येत आहे. सध्या आपल्या कामापासून ते चाहत्यांचे त्याच्यावर असणारे प्रेम हे सारं भाईजान सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या सलमान खान दिग्दर्शक प्रभू देवाचा दबंग ३ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर सलमान संजय लीला भन्सालीच्या इंशाअल्लाह या चित्रपटात आलिया भट सोबत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -