घरताज्या घडामोडीलंडनवरून परतताच अनुप जलोटांना आयसोलेशनमध्ये ठेवलं!

लंडनवरून परतताच अनुप जलोटांना आयसोलेशनमध्ये ठेवलं!

Subscribe

बॉलिवूडचे गायक अनुप जलोटांना लंडनवरून परतताच आयसोलेशनमध्ये ठेवलं असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसंच त्यांनी करोना रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन प्रवाशांना केलं आहे.

चीनमधील वुहान शहरातून उदयाला आलेला करोना व्हायरस संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसमुळे देशात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान बॉलिवूड गायक अनुप जलोटा यांनी करोना व्हायरस संदर्भात ट्विट केलं आहे. सोशल मीडियावर अनुप जलोटा याचं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. त्यांना सध्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

अनुप जलोटा यांनी ट्विट करताना सांगितलं की, ‘मला महापालिकेनेद्वारे ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांसोबत वैद्यकीय सेवेच्या अंतर्गत ठेवण्यात आलं आहे. जेव्हा मी लंडनवरून मुंबईला परतलो तेव्हा मला हॉटेल मिराजमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर माझ्या तपासणीसाठी डॉक्टरांना पाठवलं. मी येथे परतलेल्या प्रवाशांना विनंत करतो की, करोना व्हायरसचा पसार रोखण्यासाठी मदत करा.’

- Advertisement -

बॉलिवूडचे गायक अनुप जलोटाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ट्विटवर खूप प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत भारतात करोना बाधितांची संख्या १३७ वर पोहचली आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच १४ जण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – करोनामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे बबड्या घरातून बाहेर पडत नाही!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -