घरमनोरंजनबॉलीवूड स्टार्सकडून तुम्हाला 'संक्रांतीच्या' शुभेच्छा

बॉलीवूड स्टार्सकडून तुम्हाला ‘संक्रांतीच्या’ शुभेच्छा

Subscribe

महाराष्ट्रात परिचीत असलेल्या मकर संक्रांतीला पंजाबमध्ये 'लोहरी', तमिळनाडूमध्ये 'पोंगल' आणि आसाममध्ये 'बीहू' म्हटले जाते.

येत्या १४ आणि १५ जानेवारीला देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाईल. मकर संक्रातीच्या सणाची विविध देशात आणि प्रांतामध्ये वेगवेगळी नावं आहेत. या बहुप्रांतीय सणाला मकर सक्रांत, बीहू, पोंगल, लोहरी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. महाराष्ट्रात परिचीत असलेल्या मकर संक्रांतीला पंजाबमध्ये ‘लोहरी’, तमिळनाडूमध्ये ‘पोंगल’ आणि आसाममध्ये ‘बीहू’ म्हटले जाते. या मूहुर्तावर सूर्याचे दक्षिणायन संपते आणि उत्तरयाण सुरु होते. थोडक्यात या दिवसापासून पृथ्वीवरील प्रत्येक दिवस मोठा मोठा होत जातो. असं विशेष महत्व प्राप्त असलेला हा बहुभाषिक सण बॉलीवूडचे कलाकारही तितक्याच उत्साहाने साजरा करतात. हे स्टार्स आपापल्या प्रांतानुसार आणि प्रथेनुसार मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. अनेक बॉलीवूड कलाकार तर संक्रांतीला न विसरता पतंगबाजी देखील करतात. अशाच काही सुपरस्टार्सनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या बिग बींनी त्यांच्या खास शैलीतून प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये उत्तरायणाचे महत्वही सांगतिले आहे. ‘सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर वातावरणात अनेक बदल होत असतात. देशात शेतकरी नव्या पिकाचा उत्सव साजरा करतात. सर्वांना लोहरी, मकर संक्रांती, बिहू, उत्तरायणी आणि पौष पर्वाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा’ असं ट्वीट करत बिग बींनी सर्व भाषिक चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्यासोबत अन्य कोणकोणत्या कलाकारांनी चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, यावर एक नजर टाकूया…

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -