Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस करणार कंगनाची चौकशी कारण…

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस करणार कंगनाची चौकशी कारण…

इंडस्ट्रीमध्ये मूव्ही माफियांचा राज चालतो. काही लोकांमुळे आणि ठराविक मीडिया ग्रुपमुळे सुशांतला आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे कंगनाने म्हटले होते.

Mumbai

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक लोकांचे जवाब नोंदवल्या नंतर आता पोलीस अभिनेत्री कंगना रानोटचा जवाब नोंदवणार आहेत. पोलिस सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचा बारकाईने तपास करत आहेत आणि आतापर्यंत सुमारे २८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत सुशांतसिंग राजपूतच्या कुटूंबातील सदस्य, त्याचा मित्र संदीप सिंह, मैत्रीण रिया चक्रवर्ती,  रूममेट सिद्धार्थ पिठानी, फिल्म दिल बेचार अभिनेत्री संजना संघी आणि इतर अनेकांनी पोलिसांकडे आपले जवाब नोंदवले आहेत.

मणिकर्णिका अभिनेत्री कंगना रानोटचाही जवाब आता नोंदवण्यात येणार आहे. सुशांतसिंग राजपूत यांचे निधन झाल्यानंतर कंगना रानोटने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड गाजला. या व्हिडिओत कंगना बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोलली आहे. सुशांतसारख्या प्रतिभावान कलाकारांना बाजूला सारण्यासाठी त्याने बॉलिवूडमधील अनेकांवर आरोप केले आहेत.

टीओआयच्या एका वृत्तानुसार, वक्तव्य नोंदवण्यासाठी पोलिसांनी कंगना आणि चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना बोलावले आहे. सुशांतच्या बाबतीत, दोघांचे थेट संबंध नाहीत, जरी ते सुशांतच्या मृत्यूबद्दल उघडपणे मत मांडत आहेत. याच अहवालात असा दावा केला गेला आहे की, चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनाही त्यांचे निवेदन नोंदवण्यासाठी बोलावले जाईल. अहवालानुसार, प्रोडक्शन हाऊस वायआरएफचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनाही दुसर्‍या फेरीच्या चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

कंगनाने आताच्या व्हिडिओमध्ये सुशांतच्या संबंधी कोणकोणत्या पेपरमध्ये कशा बातम्या छापून आल्या आहेत, याची यादी वाचून दाखवली आहे. अशा बातम्यामुळे कोणाचेही खच्चीकरण होईल. त्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसते. मात्र अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या बातम्या स्टार किड्सच्या बाबतीत छापून येत नाही. या इंडस्ट्रीमध्ये मूव्ही माफियांचा राज चालतो. काही लोकांमुळे आणि ठराविक मीडिया ग्रुपमुळे सुशांतला आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे तिने म्हटले आहे.


हे ही वाचा – Video : कंगना म्हणते; मूव्ही माफियांमुळेच झाला सुशांतचा मृत्यू