बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे ८८ व्या वर्षी निधन

Mumbai
actress nimmi

दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी शोधलेली प्रथम अभिनेत्री निम्मी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. त्या गेल्या काही काळापासून अत्यवस्थ होत्या. सरला नर्सिंग होम येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निम्मी यांचे वडील मेरठ येथील होते, तर निम्मी यांचा जन्म आग्रा येथे झाला होता. त्यांची आई वहीदन या देखील प्रसिद्ध कलाकार होत्या. निम्मी यांनी बरसात, उडन खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे महबूब अशा अनेक हिंदी चित्रपटात काम केले होते.

राज कपूर यांनी नवाब बानू हे नाव बदलून निम्मी हे नाव ठेवले होते. असे सांगितले जाते की, राज कपूर यांना बरसात चित्रपटासाठी एक नवीन चेहरा हवा होता. या चेहऱ्याचा शोध त्यांना निम्मी यांच्यापर्यंत घेऊन आला.