घरमनोरंजन#BoycottFilmFare : गली बॉयला मिळालेल्या पुरस्कारांवर नेटकरी नाराज!

#BoycottFilmFare : गली बॉयला मिळालेल्या पुरस्कारांवर नेटकरी नाराज!

Subscribe

नुकताच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा फिल्मफेअर आसामची राजधानी गुवाहाटीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी गली बॉय चित्रपटाने ऑस्करमध्ये बाजी मारली. वेगवेगळ्या विभागात मिळून १३ नामांकन मिळाली. फिल्मफअरला १३ नामांकन मिळवणारा गली बॉय हा पहिला चित्रपट ठरला. मात्र गली बॉयच्या पुरस्कारामुळे नाही वेगळ्या कारणामुळे फिल्मफेअर चर्चेत आाला आहे.

- Advertisement -

पुरस्कार देताना पक्षपातीपणा करण्यात आल्याचा ठपका नेटकऱ्यांनी ठेवला आहे.#BoycottFilmFare असा हॅशटॅग नेटकऱ्यांनी सुरू केला आहे. अनेक चांगले चित्रपट आणि कलाकार पुरस्कारास पात्र असताना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. गली बॉयला मिळालेल्या पुरस्कारावर सिनेचाहत्यांनी आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

गली बॉय पेक्षा केसरी चित्रपटातील गाणं पुरस्कारासाठी पात्र असताना अपना टाईम आयेगा गाण्याला पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पक्षपाती आणि खऱ्या कलेला डावलणारा आहे. त्यामुळे फिल्मफेअरवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. या आशयाच्या हजारो पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यामुळे फिल्मफेअर बंदी घालायला हवी. सर्वोत्कृष्ट गाण्याप्रमाणेच सर्वोकृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी शाहिद कपूर आणि सर्वोकृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी कंगना रनौतला हा पुरस्कार मिळायला हवा होती अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -