घरमनोरंजनभाजपाला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या...

भाजपाला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या – कंगना

Subscribe

मी ही तुमच्यासारखी समजूतदार असती तर काँग्रेसला खुश ठेवू शकली असती. मी किती मुर्ख होते ना ? असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्रा कंगना रनौत नेहमीत तिच्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असते. नवीन वर्षांतही ती काही शांत बसलेली नाही. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत २०२०मध्ये दोघींमध्ये शाब्दिक चमचक झाली होती. दोघींमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. कंगना कोणावरही निशाणा साधण्याची वाटच पाहत असते. आता तिने उर्मिला मातोंडकर यांच्यावर हल्ला बोल केला आहे.

‘मी भाजपाला पाठिंबा देऊन मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. मी माझ्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस ते घर तोडत आहे’, असे ट्विट करून कंगनाने उर्मिलावर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘भाजपाला खुश खरून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असती तर काँग्रेसला खुश ठेवू शकली असती. मी किती मुर्ख होते ना ?’, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिचे चाहतेही तिच्या या ट्विटची मजा घेताना दिसत आहेत.

- Advertisement -

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसपक्ष सोडून शिवसेने प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश घेताच उर्मिलाने नवीन ऑफिस खरेदी केले आहे. या ऑफिससाठी उर्मिलाने तब्बल तीन करोड रूपये खर्च केले आहेत. उर्मिलाच्या या नव्या ऑफिसच्या मुद्द्यावरून कंगानाने चांगलाच निशाणा साधला आहे. कंगनाच्या या ट्विटवर उर्मिलाने तोडीस तोड असे तिच्या शैलीत उत्तर दिले आहे. ‘प्रिय कंगनाजी, माझ्या बद्दलचे तुमचे विचार मी एकले, मीच नाही तर संपूर्ण देशाने ऐकले आहे. संपूर्ण देशासमोर सांगते की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्र घेऊन मी येते. २०११मध्ये स्वत:च्या मेहनतीवर अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा त्यात पुरावा मिळेल’, असे उर्मिलाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

- Advertisement -

‘२५- ३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर मा ही संपत्ती विकत घेतली आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून हे ऑफिस विकत घेतले आहे. २०२०मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्याऑफिसची कागदपत्रे असतील’, असे उर्मिलाने म्हटले आहे. खार येथे उर्मिलाने तीन कोटींचे ऑफिस विकत घेतले. या बातमीमुळे उर्मिलाबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. शिवसेनेच प्रवेश करताच उर्मिलाने ऑफिस विकत घेतले असे म्हटले जात होते. मात्र उर्मिलाने याचे उत्तर देत कंगनालाही खडे बोल सुनावले आहेत.


हेही वाचा – जानेवारीतही मुंबईत तुरळक पावसाची हजेरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -