Video : सारा -कार्तिकच्या किसींग सीनला सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री, व्हीडिओ व्हायरल!

Mumbai

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. व्हॅलेनटाईन डे ला त्यांचा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच चित्रपटाची खूप चर्चा होती. सध्या जोरदार चित्रपटाच प्रमोशन सुरू आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे ती सारा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीची. सेन्सॉर बोर्डाने नुकतंच या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिले असून त्यातील काही इंटिमेट दृश्यांना कात्री लावली आहे.

चित्रपटातील अनेक दृश्यांना कात्री लावण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. सारा आणि कार्तिकचे इंटिमेट सीन काढून टाकण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आले आहे. सारा-कार्तिकच्या किसींग सीनला कात्री लागणार आहे.

त्याचप्रमाणे अनेक दृश्य ब्लर करण्यात येणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा-कार्तिकचा एक किसिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता सेन्सॉर बोर्डाने किसिंग सीनलाच कात्री लावल्याने पुन्हा एकदा तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. . या चित्रपटात रणदीप हुडा आणि आरुषी शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.