आकाशवाणीच्या ९२ व्या वर्धापन दिना निमित्ताने….

आकाशवाणीची २३ जुलै १९२७ रोजी स्थापना झाली. यामुळे हा दिवस 'प्रसारण दिन' म्हणून साजरा केला जातो

Mumbai

आपल्या घराघरात कधीकधी सकाळीच सुरूवात ही रेडिओने सुरू होत असते. संगीत, माहिती, प्रश्नोत्तर आणि इतर गोष्टीची सरमिसळ असलेले अनेक कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारित होत असतात. आकाशवाणी माध्यम हे मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत असते. आज या आकाशवाणीला ९२ वर्षे पूर्ण होत आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यानुसार आज ही आकाशवाणी अतिशय जोमाने वाटचाल करत आहे.

इंग्रज सरकारने बी.बी.सीच्या धर्तीवर भारतात ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ स्थापना करून २३ जुलै १९२७ रोजी पहिल्यांदा मुंबई आणि कोलकता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. ‘प्रसारण दिन’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभागची स्थापना करण्यात आली. ‘ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या १९५७ साली ‘आकाशवाणी’ हे नाव ठरविण्यात आले होते. जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला.

आकाशवाणीतील झालेले बदल

आकाशवाणीच्या या प्रवासात अनेक बदल झाले. आकाशवाणीत पहिल्या तबकडी असायच्या आता त्या जागी कंप्यूटर आला आहे. यामुळे कोणत्याही श्रोत्यांनी केलेल्या गाण्यांची फरमाईश ही लगेच पूर्ण करता येते. यापूर्वी श्रोत्यांनी केलेल्या गाण्यांची फरमाईश ही त्या दिवशीच्या कार्यक्रमात लिहून घेतली जात होती आणि ती फरमाईश दुसऱ्या दिवशी पूर्ण केली जात होती. तसेच आता व्हाट्सअॅपद्वारे आपण आकाशवाणी सोबत संपर्क करणे सहज शक्य झाले आहे. मोबाईलवर रेडिओ ऐकण्याकरिता इअयरफोनची आवश्यकता असायची पण आता त्यांची गरज नाही. असे वेगवेगळे बदल आकाशवाणीमध्ये सध्या झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here