घरट्रेंडिंग'या' सेलिब्रेटींनी केले टीम 'इंडिया'चे अभिनंदन!

‘या’ सेलिब्रेटींनी केले टीम ‘इंडिया’चे अभिनंदन!

Subscribe

भारतानं पुन्हा एकदा वर्ल्डकपमधल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली असून अनेकांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे. तर बॉलिवूडच्या दिग्गजांनी ट्विटरद्वारे भारताचे अभिनंदन केले आहे.

भारतानं पुन्हा एकदा वर्ल्डकपमधल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत कुठल्याच सामन्याबद्दल इतकी उत्सुकता, इतकं गांभीर्य, इतकी गुंतवणूक आणि चाहत्यांचा इतका पाठिंबा दिसला नाही, जितका तो रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये दिसला. आणि ते अपेक्षितही होतं. वर्ल्डकपची घोषणा झाल्यापासून ज्या सामन्याबद्दल भारतपाकिस्तानमधल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, त्या सामन्यात तमाम भारतीयांच्या अपेक्षेप्रमाणेच भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध अपराजित राहाण्याचा आपला विक्रम कायम राखलाविजयानंतर अवघ्या देशभरात जल्लोष आणि उत्साह भरभरुन वाहताना दिसला. अशात बॉलिवूडनेही सोशल मीडियावर ट्विट करुन टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

अभिनंदन टीम भारत

अभिनंदन टीम भारत! फ्रॉम भारत असं म्हणत अभिनेता सलमान खानने इंडियाची जर्सी घातलेला फोटो ट्विट केला आहे. सलमान खानच्या ट्विटरला ३५ हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – World Cup 2019 – इतिहासाची पुनरावृत्ती! पाकिस्तानसमोर वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच!


वाह! काय विजय आहे, असे म्हणत तमन्ना भाटियानेही ट्विट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

हे सात जन्माचं नातं आहे. आज सातवा फेराही पूर्ण झाला. पाकिस्तानने असंच हरत रहावं, मेन इन ब्लूचं अभिनंदन या आशयाचं ट्विट विवेक ओबेरॉयने केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -