प्रदर्शनापूर्वी गली बॉयच्या ‘या’ दृष्यांना कात्री

Mumbai
Gully boy
सेन्सॉरमने मारली कात्री

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या एका झोपडपट्टीत वाढलेल्या तरूणाची गोष्ट म्हणजे ‘गली बॉय’. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर गली बॉयचे प्रदर्शन आलं असताना सेन्सॉरने मात्र चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि अलिया भट प्रमुख भुमिकेत आहेत दिसणार आहेत.

ही दृश्य सेन्सॉरच्या कात्रीत

प्रदर्शनापूर्वी गली बॉय या चित्रपटाच्या काही दृष्यांना सेन्सॉरने कात्री लावली. त्यातील एक म्हणजे आलिया आणि रणवीरचा किसिंग सीन. चित्रपटात आलिया आणि रणवीरचे १३ सेकंद किसिंगचा सीन होता. हा सीन दीर्घ असल्यामुळे सेन्सॉरने त्या दृष्याला कात्री लावली आहे. त्याचप्रमाणे या दृष्याच्या शॉटमध्येही बदल करण्यात आला आहे. हा सीन आता प्रेक्षकांना जवळून पाहता येणार नाही. कारण हे दृष्य आता वाईडर शॉटमध्ये बदलण्यात आले आहे.त्याचप्रमाणे आणखी काही दृष्यांनाही कात्री लावण्यात आली आहे. अनेक दृष्यांमध्ये असणाऱ्या शिव्याही बीप करण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या ब्रॅण्ड पार्टनरच्या यादीतून रॉयल स्टॅग चं नाव क्रेडीट लिस्टमधून वगळण्यात आले आहे.

सध्या या प्रोमोमधील आलिया आणि रणवीरचे संवाद चांगले गाजत आहेत. प्रेक्षकांनी गली बॉयच्या गाण्यांना आणि ट्रेलरला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटामध्ये आलिया एका मेडिकल स्टुडंटची भूमिकेत आहे. तर रणवीर पहिल्यांदाच एका रॅपरच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे रणवीर आणि आलियासोबतच मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषदेखील झळकणार आहे. या चित्रपटात अमृता रणवीरच्या आईच्या भूमिकेत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here