घरमनोरंजनSushant Sucide Case : रिया देत होती सुशांतला ओव्हरडोज; बिहार पोलिसांचा आरोप

Sushant Sucide Case : रिया देत होती सुशांतला ओव्हरडोज; बिहार पोलिसांचा आरोप

Subscribe

सुशांत सिंह राजपूतच्या संबंधात नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत. ताज्या माहितीनुसार सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेली होती. तिथे तिने त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला. बिहार पोलिसांनी तपासातून बनवलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. यानुसार बिहार पोलिसांनी रियावर हा आरोप लावला आहे. रिया आणि त्याचे कुटुंबिया सुशांतच्या आयुष्यात केवळ पैशांसाठी आले होते, असे त्यांनी नमूद केले आहे.
रियावर आरोप करत बिहार सरकारने तिच्या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांची सुशांतशी जवळीक केवळ त्याच्या पैशांसाठी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सुशांतच्या मानसिक आजाराचे दृश्य उभे केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येपूर्वी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची माहितीदेखील समोर येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही फ्लॅट मुंबईच्या खारमध्ये आहेत. याप्रकरणाची ईडी चौकशी करणार असल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीला करिअरमध्ये फारसे यश मिळालेले नाही. तरीदेखील तिने सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी मुंबईत दोन फ्लॅट कुठून खरेदी केले. एवढे पैसे रियाकडे कुठून आले, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खार परिसरात अनेक उच्चभ्रु नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती देखील प्रचंड आहेत. त्यामुळे इतका पैसा रियाकडे कसा आला?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता ईडी रियाची चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Unlock 3 : मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका; ज्येष्ठ कलाकारांना दिली शूटींगची परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -