Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘चला हवा येऊ द्या’ मंचावर झळकणार दिग्गज सेलिब्रिटी

‘चला हवा येऊ द्या’ मंचावर झळकणार दिग्गज सेलिब्रिटी

झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’मालिका यशाच्या शिखरावर

Related Story

- Advertisement -

कसे आहात मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे असे म्हणत गेल्या सहा वर्षापासून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या मंचावर आत्तापर्यंत कलाकारांपासून ते राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या आठवड्य़ात चला हवा येऊ द्या च्या मंचावर एव्हरग्रीन सिनिअर या थीमच्या अंतर्गत मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ कलाकार मंडळी हजेरी लावणार आहे. कलाविश्वातील चित्रपट, मालिका, नाटकांच्या माध्यामातून गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिकार गाजवणारी दिग्गज कलाकार मंडळी या विशेष भागातून झळकरणार आहेत. या भागात लोकप्रिय अभिनेता अशोत सराफ, निवेदिता जोशी-सराफ, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अशोक पत्की, अशोक हांडे, जयंत सावरकर हे ज्येष्ठ आणि एव्हरग्रीन कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे या विशेष भागातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होईल यात काही शंका नाही.

 

- Advertisement -