घरमनोरंजनभारतीय कलाकारांसाठी चेझ द नेक्स्ट

भारतीय कलाकारांसाठी चेझ द नेक्स्ट

Subscribe

शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीताच्याबाबतीत बोलायचे झाले तर आजचा युवक हा पाश्चिमात्य संगीताचे अनुकरण करताना दिसतो. अशाच गाण्यांवर हे युवक आपल्या नृत्याचा आनंद लुटत होते. भारतीय युवकांना पाश्चिमात्य संगीताची ओढ आहे म्हटल्यानंतर इथल्या संगीताची समज असलेल्या बर्‍याचशा संगीतकारांनी, गायकांनी ती कला आत्मसात केली. आपल्या पद्धतीने आवश्यक तिथे ती सादरही केली. ज्यांना यश आले त्यांनी जगभराचा प्रवास करुन ही भारतीय कला थेट परदेशातही रुजवली, राबविली आहे. भारतात निर्मिती केलेल्या अनेक अल्बमची विक्रमी विक्री परदेशात झालेली आहे. एवढा मोठा प्रवास केल्यानंतर आता कुठे परदेशी कंपन्यांना भारतीय परंतु पाश्चिमात्य संगीताची जाण असलेल्या वादक, गायकांसाठी काही करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. युवव्हर्सल म्युझिक ग्रूपने हा दुवा गेली अनेक वर्षे साधलेला आहे. आता मात्र स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिकही यात सक्रीय होणार आहे.

अलाईड ब्लेंडर्स अ‍ॅण्ड डिस्टिलर्स यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभलेले आहे. भारतात जे उगवते संगीतकार आहेत, जे भविष्यात जागतिक पातळीवर आपली संगीतप्रतिभा दाखवू शकतील अशा गायक, संगीतकार, वादक यांना या उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे. युनिव्हर्सल म्युझिकने त्यासाठी भारतातील निवडक तीन ग्रूप्सना मुंबईत निमंत्रित केले होते. देवराज सन्याल, विक्रम बासू, आर एस चव्हाण, पंजाबी रॅपर इक्का यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर झाला. हिअर मी हे गाणे अनुष्काने, दिल मेरा हे गाणे लेफ्ट टर्न, ब्रोकन हे अर्जुनाजा यांनी सादर सादर केले. या बॅण्डने भारतात स्वत:चे असे वलय निर्माण केले असले तरी जगभरही त्यांचा या निमित्ताने प्रवास होणार आहे. आयोजकांनी या उपक्रमाला चेझ द नेक्स्ट असे नाव देऊन तो अधिक गतीशील होईल या दिशेने प्रयत्न सुरु केलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -