चिराग वडिलांच्या भूमिकेत

Mumbai
Chirag Patil

नावाजलेल्या क्रिकेटपटूवर आता एकएक करून चित्रपट येत असले तरी काही दशकांपूर्वीही अशाच प्रकारे क्रिकेटपटूंना घेऊन चित्रपट केल्याची नोंद आहे. विनोद कांबळी, सुनिल गावस्कर, सय्यद किरमानी यांच्याबरोबर संदीप पाटील यांनीसुद्धा ‘कभी अजनबी थी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते. पुनम ढिल्लो ही या चित्रपटाची नायिका होती. चिराग पाटील हा संदीपचा चिरंजीव आहे ज्याने अनेक चित्रपटात काम केलेले आहे आणि आता तर ‘एटी थ्री’ या चित्रपटात चक्क वडिलांचीच भूमिका तो साकारणार आहे.

1983 या साली भारतीय क्रिकेटपटूंनी ‘विश्वचषक’ मिळवला होता. त्यावर ‘एटी थ्री’ हा चित्रपट आधारलेला आहे. या संघात जे खेळाडू होते त्यांच्या भूमिका साकार करण्यासाठी सध्या कलाकारांची निवड केली जात आहे. सध्यातरी रणवीर सिंग, एम्मी विर्क यांची निवड झालेली आहे. कबीर खान हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. चिराग हा वडिलांचीच भूमिका करतो आहे म्हणताना संदीपने बॅटींग-बॉलिंग कसे केले जाते याच्या टिप्स स्वत: दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here