न्यूझीलंडच्या मस्जिद हल्ल्यानंतर ‘हॉटेल मुंबई’ सिनेमावर बंदी

२६/११ ,२००८ साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित

'हॉटेल मुंबई'

न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चच्या दोन मस्जिदीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम सिनेमांवर होतांना दिसत आहे. या हल्ल्या नंतर सिनेमागृहातून देव पटेल यांचा सिनेमा ‘हॉटेल मुंबई’वर बंदी आणली. २६/११ , २००८ साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित असलेल्या या सिनेमात ऑस्करमध्ये नामांकन मिळालेला अभिनेता आरमी हैमर आणि अनुपम खैर यांनी काम केले आहे.

द न्यूझीलँड हेराल्डच्या एका अहवालानुसार, आयकॉन फिल्म डिस्ट्रिब्युशनने न्यूजीलंडमधील कोणत्याही सिनेमागृहामध्ये या सिनेमाचे प्रदर्शन केले जाणार नाही असे सांगितले. ‘हॉटेल मुंबई’ या सिनेमास अॅथोनी मारसने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासोबत जी परिस्थिती घडली हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात १६०हून अधिक लोक मृत्यू झाले असून ३०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.

‘हॉटेल मुंबई’ने प्रदर्शित झालेल्या पहिल्या चार दिवसांत ११८,००० डॉलरहून अधिक कमाई केली होती. न्यूझीलंड बॉक्स ऑफिसमध्ये तो मागे टाकणारा केवळ चित्रपट सुपरहिरो बेहेमोथ कॅप्टन मार्वेल होता. ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता अँथनी मारस यांनी दिग्दर्शित केलेला ‘हॉटेल मुंबई’ या सिनेमात आरमी हैमर, नझानिन बोनाडी, तिल्डा कोहम-हरवे, अनुपम खैर आणि जेसन आयझॅक यांची देखील भूमिका महत्त्वाची आहे.

मुंबईत दहशतवादी हल्ल्यांवर आधारित देव पटेल यांचा ‘हॉटेल मुंबई’ हा सिनेमा हॉटेल मुंबई भारतातही २९ मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.