घरमनोरंजन#MeTooच्या दोषींविरोधात विरोधात 'सिन्टा'ची नवी समिती

#MeTooच्या दोषींविरोधात विरोधात ‘सिन्टा’ची नवी समिती

Subscribe

#MeTooच्या दोषींविरोधात विरोधात 'सिन्टा'ची नवी समिती स्थापन होणार आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर, रवीना टंडन , रेणूका शहाणे या समितीचे सदस्य असणार आहेत.

मीटू चळवळीच्या माध्यमातून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर आरोप झाले आहेत. या चळवळीमध्ये सिने जगतातले मोठमोठी नावे लैंगिक शोषणांच्या आरोपांच्या सावटात आले. अनेक कलाकारांनी मीटू चळवळीला पाठिंबा दिला होता. आता सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सिन्टा) देखील या चळवळीला पाठिंबा दर्शवत एक नवीन समिती आखत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर, रवीना टंडन , रेणूका शहाणे या समितीचे सदस्य असणार आहेत.

स्वरा भास्करसोबत बोलणं झालं आहे – शुशांत सिंह

सिन्टाचे सरचिटणीस सुशांत सिंह यांनी सांगितले की, ‘चित्रपट सृष्टीमध्ये अशा घटना घडत असतील तर त्यांवर आळा कसा घालता येईल, याविषयी आम्ही मोठमोठ्या लोकांची मतं जाणून घेत आहोत. शिवाय, त्यानुसार आम्ही समिती देखील स्थापन करत आहोत. या समितीमध्ये अभिनेत्री रेणूका शहाणे, दिग्दर्शक अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकिल वृंदा ग्रोव्हर आणि काही मनोविकारतज्ज्ञांचा देखील समावेश असणार आहे’. त्याचबरोबर स्वरा भास्करसोबत आमचं बोलणं देखील झालं असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

काय उद्देश असेल समितीचा?

शुशांत सिंह यांनी सांगितल्यानुसार, या समितीचा उद्देस हा महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा करणं असेल. त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतील त्यांच्यासोबत कुणीही काम करणार नाही, असे त्यांनी सांगितले. समिती नियमांचे खबरदारीही घेणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – वो टॅलेंट ही क्या; जो किसी के काम ना आए!
मराठमोळ्या सचिन कारंडेचा ‘जॅक अँड दिल’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -