घरमनोरंजन'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमात महाराष्ट्राच्या या कन्या येणार

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमात महाराष्ट्राच्या या कन्या येणार

Subscribe

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या तीन कन्या राही सरनोबत, पूनम राउत आणि ललिता बाबरया येणार आहेत. तसेच व्यसनमुक्तीसाठी चालणाऱ्या 'मुक्तांगण' संस्थेच्या मुक्तादीदी पुणतांबेकर आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुक्ताताई दाभोळकर देखील येणार आहेत.

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये दर आठवड्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पाहुणे येतात. या कार्यक्रमामध्ये पाहुणे अनेक किस्से सांगतात, काही न ऐकलेल्या गोष्टी देखील प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे ऐकायला मिळतात. मकरंद अनासपुरे यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद, कार्यक्रमाचे एकूणच स्वरूप प्रेक्षकांना आवडत असून, या आठवड्यामध्ये कार्यक्रमाच्या मंचावर रंगणार आहेत खुमासदार गप्पा. कारण मंचावर हजेरी लावली आहे आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताच नावं उंचवणाऱ्या महाराष्ट्राच्या तीन कन्या राही सरनोबत, पूनम राउत आणि ललिता बाबर या येणार आहेत. तसेच व्यसनमुक्तीसाठी चालणाऱ्या ‘मुक्तांगण’ संस्थेच्या मुक्तादीदी पुणतांबेकर आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुक्ताताई दाभोळकर देखील येणार आहेत.
हे दोन विशेष भाग येत्या ११ आणि १२ रोजी रात्री ९.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

असा झाला ‘मुक्तांगण’ संस्थेचा जन्म

या कार्यक्रमामध्ये जेंव्हा मकरंद अनासपुरे यांनी मुक्तादिदींना विचारले ‘मुक्तांगण’ सारखी व्यसनमुक्तीसाठी काम करणारी संस्था सुरु करावी हि कल्पना कोणाची ? आणि हे समर्पक नावं कोण सुचवले? यावर मुक्तादीदींनी या संस्थेबद्दलची माहिती सांगितली आहे. त्या म्हणाल्या जवळपास ८० च्या दशकात संपूर्ण देशामध्ये गर्दाच्या व्यसनाची लाट आली. अनेक तरूण मंडळी याच्या आहारी गेले आणि त्यामुळे बाबांनी हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच संदर्भात त्यांनी एका वृत्तपत्रात ‘गर्दाच्या विळख्यात’ मालिका लिहिली. ही मालिका पु.ल.देशपांडे आणि सुनीता बाई देशपांडे यांनी वाचली ते वाचून दोघे खूप अस्वस्थ झाले. त्यांना भेटायला माझे आई – बाबा गेले त्यांनी चर्चा केली आणि आम्ही काय करू शकतो असे देखील विचारले. माझी आई म्हणाली ‘व्यसनमुक्ती’ केंद्र सुरु करू शकतो आणि तिथूनच ‘मुक्तांगण’ चा जन्म झाला. ‘मुक्तांगण’ हे नाव पु.लं.देशपांडे यांनीच सुचवले. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली.

- Advertisement -

‘मुक्तांगण’ संस्थेची परंपरा

‘मुक्तांगण’ संस्थेची एक परंपरा आहे. प्रत्येक दिवाळीमध्ये मुक्तांगणचे मित्र आकाशकंदील तयार करतात. पहिला आकाशकंदील हा पु.लंच्या घरी जायचा आणि वर्षभर ते हा आकाशकंदील ठेवत.

आजच्या मुली खेळामध्ये भरीव कामगिरी करतात. या आठवड्यामध्ये आपल्या देशाचे नाव जगभरात उज्ज्वल करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तरुण, तडफदार रणरागिणी राही सरनोबत, पूनम राउत आणि ललिता बाबर यांनी हजेरी लावली आहे. राही सरनोबत आणि ललिता बाबर यांना एखादा अपमानाचा किस्सा आठवतो का? असे विचारले गेले आहे. तसेच राही सरनोबत यांना फजितीचा देखील प्रसंग विचारण्यात आला. याची त्यांनी काय उत्तरं दिली हे जाणून घेण्यासाठी हा विशेष भाग पाहावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -